Sunday, September 19, 2010

गणेशोत्सव २०१०

|| गणपती बाप्पा मोरया ||

आपला गणेशोत्सव २०१० कार्यक्रम मस्तच झाला. सगळ्या कलाकारांच्या  मेहनतीला दाद दिली पाहिजे. त्यानाही मोठे धन्यवाद! आपण सगळ्यांनी ऑनलाईन तिकिटास  भरगोस प्रतिसाद दिल्या बद्दल धन्यवाद! 

गणेशोत्सव २०१० च्या वृतांत आणि फोटो गॅलरीसाठी येथे क्लिक करा.  

आपण कार्यक्रमाचे व्हीडीओ ऑनलाईन अपलोड केले असल्यास ती लिंक आम्हाला पाठवा,




आपल्या कार्यक्रमाबद्दलच्या प्रतिक्रिया ब्लॉगवर पोस्ट करा. 

धन्यवाद!

आपले
ब्लुमिंग्टन् नॉर्मल् मराठी मंडळ 

Wednesday, April 21, 2010

पाडवा २०१० कार्यक्रम - तीन अंकी नाटक “प्रेमा तुझा रंग कसा?”

नेहमीप्रमाणे नाटकाचा कार्यक्रम जोरदार झाला. कार्यक्रमाचा वृतांत लवकराच प्रसिद्ध करू.

आपल्या मंडळाला ह्या वर्षी (२०१० साली) १० वर्षे पर्ण झाली, मंडळ सुरू झाल्यापासून दरवर्षी गुढीपाडवा तीन अंकी मराठी नाटकाने साजरा होतो. आजवर या नाटकांच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे आपल्या लाडक्या श्री. गौतम करंदीकर यांनी. दहा वर्षातील १० नाटके, त्यांचे एकंदर ३३ प्रयोग.... ६० कलाकारांचा सहभाग...! अश्या या अभिमानास्पद नाट्यप्रवासाचे दिशादर्शक, दिग्दर्शक गौतम करंदीकर यांना सर्व कलाकारांतर्फे मानाचा मुजरा!!!!!! या निमिताने १०व्या प्रयोगाच्यावेळी दि.१७-एप्रिल-२०१० रोजी प्रकाशित करीत आहोत... "करंदीकरांची फॅक्टरी"